प्रतिष्ठा न्यूज

कहो दिलसे, कॉंग्रेस फिरसे ! माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत सांगलीत कॉंग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेचा प्रचंड उत्साहात समारोप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीत गुरूवारी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कुपवाड येथून जनसंवाद पदयात्रेस सुरूवात झाली. पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली तिचाच एक भाग म्हणून राज्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. समारोपाच्या पदयात्रेला मिळालेला जोरदार प्रतिसाद पाहता भारत जोडो यात्रेची पुन्हा एकदा आठवण झाली.

कॉंग्रेसने केंद्र व राज्य सरकारकडून चाललेल्या चुकीच्या कारभाराचा भांडाफोड सर्वसामान्य जनतेत जाऊन केला. काँग्रेस पक्ष देशातल्या जनतेला न्याय देवू शकतो हे लोकांच्या आता लक्षात आले आहे. लोकांचे ज्वलंत प्रश्न समजावून घेवून संवाद साधणे हा मुख्य उद्देश पदयात्रेचा होता. यात्रेच्या माध्यमातून आपण सर्व भारतीय पुन्हा एकदा एकत्र येवू व जातीयवादी प्रवृत्तींना गाडून टाकू असा निर्धार या निमित्ताने करण्यात आला.

सांगली जिल्ह्यात आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली १७५ कि.मी. ची पदयात्रा पुर्ण झाली. यात्रेत सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, डॉ. जितेश कदम, शैलजाभाभी पाटील व तालुक्यातील नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

शेवटच्या दिवशी कुपवाडमधून पदयात्रा सुरू झाली. या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, आ. विक्रम सावंत, शैलजाभाभी पाटील, सिकंदर जमादार, अण्णासाहेब कोरे सहभागी झाले होते.

कुपवाड येथे जनसंवाद यात्रेचे नियोजन सनी धोतरे, कुमार पाटील, अख्तर हुसेन मुजावर, समीर मुजावर, श्रीकृष्ण कोकरे यांनी केले, तर सुतगिरणी चौक येथे रवी खराडे, प्रशांत देशमुख, मनोज सरगर, रोहित नगरकर, लक्ष्मी मंदीर येथे प्रशांत पाटील, अल्ताफ पेंढारी, संजयनगर येथे संजय कांबळे, महेश साळुंखे, मनोज सरगर, उमेश पाटील, आनंदा लेंगरे, अहिल्यादेवी होळकर चौक येथे संतोष पाटील, इलाही बारूदवाले, रोहिणी पाटील, स्टेशन चौक, वडर गल्ली येथे अमर निंबाळकर, प्रकाश मुळके, आशिष चौधरी, शेवंता वाघमारे, कॉलेज कॉर्नर येथे अशोक शेठ, राजेंद्र मुळीक, राजेंद्र कांबळे, पटेल चौक येथे प्रमोद सुर्यवंशी, अजित सुर्यवंशी, कय्युम पटवेगार, शशिकांत नागे, गणपती पेठ येथे शितल सदलगे, मारूती चौक येथे आशिष कोरी, शुभम बनसोडे, शिवाजी मंडई येथे विनायक रूपनर, फौजदार गल्ली येथे करीम मेस्त्री, नामदेव चव्हाण, सभेचे नियोजन बिपीन कदम, मयुर पाटील, तौफिक शिकलगार, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, विजय आवळे, इरफान शिकलगार, किरण जगदाळे, रहिम हट्टीवाले, सोहेल बलबंड यांच्या सहभागाने सांगली, कुपवाड भागातील कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेच्या अलोट गर्दीत मोर्चा मार्गस्थ झाला. ठिकठिकाणी प्रभागात नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जेसीबीमधुन पृष्पवृष्टी, क्रेननच्या मदतीने मान्यवरांच्या गळ्यात हार घातला, सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. दुतर्फा रांगोळ्या काढून फटाके वाजवून, विविध प्रकारच्या आतषबाजीने जनसंवाद यात्रेचे स्वागत केले.

चौकाचौकात स्वागताचे होर्डींग्ज, डिजीटल फलक व कॉंग्रेस पक्षाचे ध्वज झळकत होते. अमाप उत्साहात निघालेली ही पदयात्रा भारत सुतगिरणी, लक्ष्मी देऊळ, वसंतदादा कुस्ती केंद्र, संजयनगर, अहिल्याबाई होळकर चौक, रेल्वे स्टेशन, वडर कॉलनी, कॉलेज कॉर्नर, पटेल चौक, झाशी चौक, सराफ कट्टा, कापड पेठ, बालाजी चौक, मारूती चौक, फौजदारी गल्लीतून हिराबाग कॉर्नर येथे येऊन पदयात्रेचे सभेत रूपांतर झाले.

जनसंवाद यात्रेमुळे सांगली, कुपवाड कॉंग्रेसमय झाले. या यात्रेमुळे जनतेच्या महागाई, बेरोजगारी, नागरी समस्या याबाबत जनतेत चर्चा झाली. कॉंग्रेस समस्या ऐकण्यासाठी संवाद साधत आहे. ‘नफरत छोडो – भारत जोडो’ हा महत्वपूर्ण संदेश जनतेला या पदयात्रेतून मिळाल्याची चर्चा होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.