प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी व चारा छावण्या सुरू करा : महेश खराडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : राज्यासह सांगली जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे ओढे नदी तलाव बंधारे कोरडे पडले आहेत पिके करपून गेली आहेत चाऱ्याचा गभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा , कर्जमाफी द्यावी चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा दुष्काळी जत आटपाडी कवठेमहांकाळ खानापूर तासगाव तालुक्यात रास्ता रोको सह तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला
खराडे म्हणाले चालू खरीप हंगामात सरासरी पेक्षा कमी झाला आहे त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या तेथील पिके करपून गेली आहेत त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गभीर निर्माण झाला आहे कमी पावसामुळे गवताची ही वाढ चांगली झाली नाही त्यामुळे 15 लाख पशू धन अडचणीत आले आहे
चाऱ्यासाठी उसाची ही तोडणी मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे साखर कारखानदारी ही अडचणीत आली आहे रब्बी हंगामात ही पावसाची ही शक्यता दिसत नाही कोयना वारणा सह छोट्या मोठ्या तलाव व धरणात ही पाणी साठा पुरेसा नाही त्यामुळेच दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे कर्नाटक सरकारने ही दुष्काळ जाहीर केला आहे त्यामुळेच राज्यासह सांगली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा नुसते दुष्काळ जाहीर करून चालणार नाही तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज माफी ही जाहीर करावी द्राक्ष , बेदाणा, ऊस, डाळिंब ,दूध उत्पादकासह भाजीपाला व कोरड वाहू शेतकरी उत्पादकांना कर्ज माफी देण्याची गरज आहे त्याच बरोबर पशू धन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात शैक्षणिक शुल्क माफ करावे एस टी पास मोफत देण्यास सुरू करावे शेतसारा माफ करावा या सर्व मागण्यासाठी संघटनेच्या वतीने दुष्काळी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन लवकरच करण्यात येईल असा इशारा खराडे यांनी दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.