प्रतिष्ठा न्यूज

प्रसिद्ध टेलर बालाजी मादसवार यांचे हृदय विकाराने निधन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : येथील जेष्ठ नागरिक बालाजी धर्माजी मादसवार ( टेलर) यांचे आज दि. 24 ऑक्टोबर 2022 रोज सोमवारी दुपारी 3-30 वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असुन मृत्यू समयी त्यांचे वय 59 वर्षे होते.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दि 25 ऑक्टोबर रोजी मुळ गाव उमरा येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत प्रेमळ स्वभाव असलेले कै. बालाजी मादसवार यांना सामाजिक कार्या बरोबर भजन किर्तन यांची खुप आवड होती. तसेच ते महिलांचे ( लेडीज )टेलर म्हणुन खुप प्रसिद्ध होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, 1 सुन, व नातवंडे असा परिवार आहे.
ते नारायण मादसवार यांचे वडील तर बाबु मादसवार गुरुजी यांचे चुलते होते.
ऐन दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या दिवशी अशा प्रेमळ व सर्वांना आपुलकीने बोलणाऱ्या बालाजी टेलर यांच्या जाण्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
” प्रतिष्ठा न्युज आपल्या दुःखात सहभागी आहे”

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.