प्रतिष्ठा न्यूज

पत्रकारांनी निर्भयपणे कर्तव्य पार पाडावे ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे; ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकशाहीचे चारीही स्तंभ फोडण्याचे काम राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. प्रामाणिक पत्रकारांना टिपून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पत्रकारांनी कोणत्याही धमक्यांना भिक न घालता निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना जीवनगौरव पुरस्कार व विविध पत्रकार पुरस्काराचे वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर होते.
वागळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्याविरोधी भूमिका घेतल्यानंतर अनेक पत्रकारांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या. काँग्रेसच्या राजवटीत वेगळ्या पद्धतीने इशारे मिळायचे मात्र पत्रकार ठाम असेल तर ते नाद सोडून द्यायचे. आता पत्रकारांचे स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. सध्या निर्भीडपणे पत्रकारांना काम करता येत नाही. घटना बदलून सामान्यांचे अधिकारीही नाहिसे करण्याचे काम सुरू आहे. मोदींच्याविरोधात लिहणार्‍यांना टार्गेट केले जाते. महिलांना ट्रोल केले जाते. हे अत्यंत घात असून, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. हा धोका ओळखून पत्रकारांनी आताच जागृत झाले पाहिजे. अन्यथा आपल्या पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी सुनील कदम, गुरुबाळ माळी, संपत मोरे, यांना राज्यस्तरीय, जयसिंग कुंभार, विनायक जाधव,दत्तात्रय सपकाळ, संतोष भिसे, किरण जाधव
राजेंद्र काळे, सुरज मुल्ला , प्रताप महाडिक विजय गराडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता तर उत्कृष्ट छायाचित्रकार
सचिन सुतार, सुरेश मोकाशी, एस पी घोरपडे यांना, उत्कृष्ट व्यंगचित्रकार पुरस्कार विजय नांगरे, उत्कृष्ट पर्यावरण पत्रकारिता संदीप नाझरे,
प्रवीण शिंदे यांना प्रदान करण्यात आला. तर उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार विनायक कदम,प्रसाद पिसाळ, गोरख चव्हाण, सुनील पाटील, प्रशांत नाईक, त्रिरत्न कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर म्हणाले, आम्ही जेव्हा पत्रकारिता सुरू केली, त्यावेळी आमच्यासमोर ध्येयवाद होता. अन्याय, अत्याचाराविरोधात आम्ही पत्रकारिता सुरू केली. 1972 चा दुष्काळात ग्रामीण जनतेची होरपळ आम्ही पाहिली. लेखनीद्वारे त्यांच्या समस्या वृत्तपत्रातून मांडल्या. त्यानंतर आणिबाणीचा काळ अनुभवला. या अनुभवातूनच आम्ही स्वत:ला घडवत गेलो. सध्या मात्र पत्रकारांपुढे कोणताही ध्येयवाद नाही. त्यामुळे पत्रकारांचे नुकसान होत आहे. परिस्थिती कोणतीही असली तरी त्यांनी ठामपणे एका भूमिकेने आपले काम करीत रहावे. पत्रकार संघाने पुरस्कार देऊन केलेल्या सत्कारामुळे आपल्याला खूपच आनंद झालेला आहे. काम करण्यासाठी आपल्याला आणखीन स्फूर्ती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कुलदीप देवकुळे यांनी सूत्रसंचालन केले तर तानाजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी कार्याध्यक्ष बलराज पवार, हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष तानाजी जाधव, चंद्रकांत क्षीरसागर, चंद्रकांत गायकवाड, किरण जाधव, प्रकाश निंबाळकर, उपाध्यक्ष अतुल जाधव, संजय माळी, दिनराज वाघमारे, शिवाजीराव चौगुले, कोषाध्यक्ष महादेव केदार, अरुण पाटील, मोहन राजमाने, सलीम नदाफ, सुधाकर पाटील, मोहसीन शेख, अक्रम शेख यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.