प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम, नवहिंद प्रतिष्ठानचे आयोजन ; शंभूराज काटकर यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्वराज्यरक्षक, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती नवहिंद प्रतिष्ठानचे शंभुराज काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शंभुराज काटकर म्हणाले, यंदा सार्वजनिक छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करीत आहोत, येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात दि १३ मे ते दि १८ मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, यामध्ये १३ मे रोजी रात्री १२ वा. जन्मतोसव सोहळा व भव्य आतषबाजी साजरी करण्यात येणार आहे.
१४ रोजी रुद्राभिषेक, १५ रोजी सायंकाळी ५ वा.हस्यगंध फेम वृषभ अकिवाटे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, दि १६ रोजी सायं सुमित डान्स अकॅडमी प्रस्तुत ५१ कलाकारांचा नृत्य, नाट्य आणि संगीतमय आविष्कार सादर केला जाणार आहे.
दि.१७ मे रोजी सायंकाळी ७ वा. प्रख्यात शिवव्यख्याते प्रा. नितीन बानूगडे पाटील यांचे जाहीर व्यख्यान, त्याच बरोबर भव्य मिरवणूक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून सांगलीकर जनतेने यामध्ये सहभागी होऊन छत्रपतींची जयंती साजरी करावी असे आवाहन काटकर यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेस उमेश चव्हाण, संतोष तावशी, अनिकेत कराळे, विनायक बंने, किशोर कचरे, किरण चव्हाण, अशोक काटकर, रेवेश पवार, विशाल येडेकर, ऋषीकेश चव्हाण, राजदीप काटकर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.