प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय क्रीडा दिन विलिंग्डन महाविद्यालयामध्ये उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : २९ ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो शिवछत्रपती पुरस्कार विजेते  बापूसाहेब समलेवाले यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भास्कर ताम्हणकर तसेच  दीपक बाबा शिंदे, सांगली विभागीय आजीव सदस्य उपप्राचार्य डॉ आर ए कुलकर्णी , विभागीय सदस्य  आर. जे. पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुरेश कुंभार जिमखाना समितीचे चेअरमन डॉ. राजू कांगणे तसेच महाविद्यालयातील प्रा. कुबेर कट्टीमनी, किशोर चंदुरे उपस्थित होते. खेळाडूंना मार्गदर्शन करताना बापू समलेवाले यांनी खेळाडूंना अतिउच्च कामगिरी करून महाविद्यालय तसेच जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. व्ही. ताम्हणकर यांनी खेळाबद्दल माहिती दिली  आर. जे. पाटील यांनी शासनाच्या विविध क्रीडा विषयक सवलती बद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ गणेश सिंहासने यांनी केले तर आभार डॉ राजू कांगणे यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.