प्रतिष्ठा न्यूज

तासगावात दलित महासंघाने काढला घोडा मोर्चा; बांधकाम विभागात कोट्यावधिंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप   

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव सार्वजनिक बांधकाम उप विभागाकडून गेल्या वर्षभरात रस्त्यांची कामे निकृष्ट करण्यात आली असून,सहाय्यक अभियंता हुद्दार व ठेकेदारांनी संगनमतानी रस्ता कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.गेल्या वर्षभरात झालेल्या सर्व रस्ता कामासह सहा.अभियंता यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून निलंबन करावे,या मागणीसाठी दलित महसंघाचे (मोहिते गट) वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर घोडा मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चा संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते यांचे आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे व जिल्ह्याध्यक्ष प्रशांत केदार यांचे नेतृत्वाखाली काढण्यात आला.यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत बसस्थानक,वंदे मातरम चौक,श्री गणपती मंदिर,शिवतीर्थ पासून बांधकाम कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.तासगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागात नवीन रस्ते व देखभाल दुरुस्तीची अनेक कामे झाली आहेत.रस्ता कामांची प्रशासकीय मान्यता,तांत्रिक मान्यता व अंदाज पत्रकाप्रमाणे कामे झाली नसून अनेक रस्त्यात निकृष्ट साधन-सामग्री वापरल्याने रस्ते निकृष्ट असून रस्त्याची जाडी-लांबी-रुंदी,थिकनेस तरतुदीनुसार नाही.रस्ता कामात आवश्यक प्रमाणात मुरूम,खडी वापरलेली नसून डांबर भेसळयुक्त वापरले आहे.त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाली आहे.त्यामुळे उपविभागात झालेल्या रस्ता निर्मिती व दुरुस्ती कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला आहे.सहा. अभियंता श्री.हुद्दार व रस्ते ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट रस्ते करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारला आहे.वर्षभरात केलेल्या सर्व रस्त्यांचे कोअर कट काढून थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासणी करावी.निकृष्ट कामे केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे.निकृष्ट कामांची बिले अदा शाखा अभियंता व सहा.अभियंता यांच्या कार्यालयीन कारभाराची खातेनिहाय चौकशी करून निलंबन करावे.यासह हुद्दार यांच्या संपत्तीची चौकशी आयकर व सक्तवसुली संचालनालय मार्फत करावी.अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी मोर्चा प्रसंगी केली.यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते,प.म.अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे,जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार,तालुका अध्यक्ष आशुतोष देवकुळे,सुशांत देवकुळे,अर्जुन थोरात,विजय घाडगे,आकाश कांबळे,गोपाळ थोरात,बंडू केंगार,काशीनाथ कोळेकर,बिरु कोळेकर,काशिनाथ पडवाळे,संजय भोमाना,अक्षय देवकुळे,दीपक कांबळे,तुकाराम साठे,महेश जुवे,विजय जाधव,राहुल जाधव,विराज मलमे,अभिषेक कांबळे,सोंगट्या कांबळे,रितेश कांबळे,करण लोखंडे,नाझी शिंदे,कपिल शिंदे,शिरा शिंदे,सुरेश सदाकळे,सारंग निकम,तन्मय माने,करणं भंडारे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.