प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहीत्य यांच्या विक्रीतुन शासनास मिळाला ५९ लाख ६८ हजार इतका महसुल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा पोलीस दलातील निकामी वाहने व साहीत्य यांच्या विक्रीतुन शासनास ५९ लाख ६८ हजार इतका महसुल मिळाला आहे.
अपर पोलीस महासंचालक दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशान्वये निकामी पोलीस वाहने व साहीत्य यांची विक्री करणेकामी केंद्र शासन पुरस्कृत एम.एस.टी.सी या अंगीकृत एजन्सी मार्फत ऑनलाईन पध्दतीने सांगली जिल्हा पोलीस दलातील १५ वर्षावरील २५ चारचाकी, ९० दुचाकी अशी एकुण ११५ वाहने स्क्रॅप करणेसाठी अधिकृत आर.व्ही.एस.एफ सेंटर श्री भाग्यलक्षमी रोलींग मिल प्रा.लि. जालना यांनी उच्चत्तम बोली लावल्याने त्यांना सदरची वाहने स्क्रॅप करणेकामी देण्यात आलीत उर्वरीत ४१ चारचाकी व १५ दुचाकी अशी एकुण ५६ वाहने व इतर निकामी साहीत्य उच्चत्तम बोली लावणा-या बोलीदार यांना देण्यात आलीत. त्याच्या विक्रीतुन शासनास ५९ लाख ६८ हजार इतका महसुल जमा करणेत आला व निकामी वाहनाची विक्री करुन पोलीस मुख्यालयातील जागा मोकळी करणेत आली.

मा श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक सांगली. श्री दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक (गृह) सांगली यांचे मार्गदर्शनाखाली श्री सचिन दंताळ पोलीस निरीक्षक मो प विभाग सांगली, श्री विकास कोठावळे मो.प पर्यवेक्षक, बापु गायकवाड स.पो.फौ. संदीप गवळी पो.हे. कॉ, गणेश चव्हाण पो. हे. कॉ, सचिन पवार पो. हे. कॉ, अजय कांबळे पो.ना यांनी कार्यवाही केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.