प्रतिष्ठा न्यूज

तासगाव आत्मा योजनेत गैरकारभाराचा अहवाल प्रकल्प संचालकांकडे,कृषी अधिकाऱ्यांची माहिती,मनसेच्या अमोल काळे यांनी दिला होता उपोषणाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तालुक्यात आत्मा योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैर कारभार झालेचा दिसून येत आहे.तालुक्यातील सुमारे ९० टक्के बचत गट विना संमती पत्राचे आहेत.शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.तालुक्यातील अनेक शेतकरी बचत गटात पूर्णपणे तारीख, साक्षीदारांच्या सहया,करारपत्र, कंपनीचे नाव तर कुठे तारखेत करण्यात आलेली खाडाखोड असे अनेक गैर प्रकार या योजने अंतर्गत केलेले दिसून येत आहे.याची चौकशी करून कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला होता.मात्र या तक्रारीच्या चौकशीचा अहवाल आत्मा प्रकल्प संचालक सांगली यांच्याकडे दिला आहे,अशी माहिती तासगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली.दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी सांगितले होते की शेतकरी गट नोंदणीचे मस्टर,गटात सहभागी सदस्यांची संख्या,गट नोंदणी प्रस्ताव प्राप्तीचा दिनांक,गट प्रमुखाचे नाव व मोबाईल नंबर,गट नोंदणीसाठी प्रस्ताव,कृषि कार्यालयास पाठवल्याचे पत्र कमांकाच दिनांक नाही,तसेच गटाचे प्रमाणपत्र प्रस्ताव मिळाल्याची गट प्रमुख व गट प्रतिनिधी यांच्याही सहया नाहीत.हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून यासाठी कारणीभूत अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १३ सप्टेंबर रोजी तासगाव कृषी विभागाच्या समोर उपोषणाचा इशारा दिला होता.मात्र या गैरकारभाचा अहवाल प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्याकडे दिला असून चौकशी सुरु असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.