तासगावात शनिवारी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ हजारो धारकरी उतरणार रस्त्यावर..
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ शनिवारी ठीक साडेदहा वाजता तासगाव शिवतीर्थ येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव तालुका यांचे वतीने हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत गुरुजींच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे.त्यानंतर तासगाव तहसीलदार व तासगाव पोलीसांना निवेदन देण्यात येनार आहे.महात्मा गांधी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काही पक्षांकडून भिडे गुरुजी यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.
परंतु भिडे गुरुजी जे बोलले तो पुस्तकातील संदर्भ असून तो फक्त गुरुजींनी वाचून दाखवला आहे, त्यामुळे गुरुजींवर होणारी कारवाई ही राजकीय आकसापोटी असून,भिडे गुरुजींच्या कार्याचा आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे काही राजकीय मंडळी भिडे गुरुजींना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे अशा प्रवृत्तींचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव च्या वतीने शनिवारी *गुरुजी के सन्मान में हिंदू मैदान मे* म्हणत धारकऱ्यांनी एकत्र येण्याचे आयोजन केले आहे.तालुक्यातील हजारो धारकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत.शिवतीर्थ वर येताना प्रत्येक धारकऱ्याने वारकरी टोपी घालून यायचे आहे असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने करण्यात आले आहे.