प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे दि.25 ,26 फेब्रुवारी रोजी विश्वविख्यात प्रवचनकार जया किशोरी यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : भाजपाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून विश्वविख्यात अध्यात्मिक प्रवचनकार जया किशोरी यांच्या अमृतवाणीतून दि. २५ व २६ फेब्रुवारी रोजी श्रीराम आणि श्रीकृष्ण कथा सादर होणार आहेत. या सत्संगात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जनतेला अध्यात्मिक समाधान मिळावे यासाठी जया किशोरी यांच्या अमृत वाणीतून श्रीराम व श्रीकृष्ण कथा होणार सादर होणार आहे.
विकासासाठी आणि धर्मरक्षणासाठीही खा. प्रतापराव चिखलीकर यांचा सातत्याने पुढाकार राहिला आहे. धावपळीच्या दुनियेत अध्यात्म संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण असून भक्तीमार्ग हा मानवी सुखाचा आणि समृद्धीचा मार्ग असल्याने अध्यात्माशिवाय वैचारिक समृद्धी शक्य नसल्याने नांदेड लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी खा. चिखलीकर यांच्या पुढाकारातून दि. २५ व २६ फेब्रुवारी रोजी हिंगोली गेट परिसरातील गुरुद्वारा मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता विश्वविख्यात अध्यात्मिक प्रवचनकार जया किशोरी यांच्या अमृतवाणीतून श्रीकृष्ण आणि श्रीराम कथा भव्य सत्संग सोहळा होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रणिता देवरे चिखलीकर यांनी केले आहे.
जया किशोरी या विश्वविख्यात भागवताचार्या असून त्यांचा जन्म दि.१३ जुलै १९९५ रोजी राजस्थानमधील एका अध्यात्मिक परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवशंकर शर्मा असून त्यांच्या आईचे नाव सोनिया शर्मा आहे. त्यांना चेतना ही लहान बहीणही आहे. जया किशोरी यांचा संपूर्ण परिवार सध्या कोलकाता येथे स्थायिक आहे. जया किशोरी या अवघ्या ७ वर्षांच्या असताना त्यांची नाळ अध्यात्मिक जीवनाशी जोडली गेली. बालपणी

त्यांच्या आजोबांकडून त्यांना श्रीकृष्ण कथा ऐकावयास मिळाल्याने त्या या कथांमुळे प्रभावित झाल्या.
जया किशोरी अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांनी संस्कृतमध्ये लिंगाष्टकम्, शिवतांडव स्तोत्र मुखपाठ करून आपल्या मधूरवाणीतून गायनास सुरुवात केली. त्या कथा,प्रवचनातून भक्तांनी दिलेल्या देणगीतून त्या अनाथ,गरीब बालकांच्या शिक्षणासाठी खर्च करीत असतात.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.