प्रतिष्ठा न्यूज

मारतळा ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम- वाया जाणारे पाणी तलावात साठवून केली पाणी टंचाईवर मात

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : – ढाकणी जलाशय वितरीके अंतर्गत येणाऱ्या व लाभक्षेत्रात सोडण्यात आलेल्या कॅनालचे पाणीलोहा तालुक्यातील मारतळा येथील ग्रामपंचायतच्या पुढाकाराणे गावा लगत असलेल्या सार्वजनिक तलावात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दोन दिवस सोडलेल्या पाणीमुळे अंदाजे 60 टक्के पाणी साठा झाला असून हा पाणीसाठा उन्हाळ्यात जनावरांना उपयुक्त ठरणार आहे.
यंदाच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्यामुळे हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवत होती.उपयोगी पाणी साठे आटत चाललेले पाहतांना दिसत होते. हे लक्षात घेऊन गाव प्रतिनिधींनी विष्णुपुरी प्रकल्पाचे सोडलेले पाणी सार्वजनिक गाव तलावात दि.18 व19 फेब्रुवारी असे दोन दिवस सोडण्यात आले. वाया जाणारे पाणी तलावात साठवून उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या काळात जनावराची भटकंती थांबून परिसरातील बोरवेल व विहिरीची पाणी पातळी कायम राहण्यास मदत होणार आहे. सोडलेले पाणी गाव तलावात साठवून ठेवण्यात गावकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.