प्रतिष्ठा न्यूज

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अ गटात धुंदवडे तर ब गटात सांगशी प्रथम

प्रतिष्ठान्यूज :तुकाराम पडवळ
 गगनबावडा : विद्यार्थी दशेत  शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करुन शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते.
या अभियान अंतर्गत   तालुक्याचे मुल्यांकन करणेत आलेले शाळांचे निकाल
विभाग अ गट,मधून ,वि.  मं. धुंदवडे -प्रथम,
वि मं.मणदूर, –द्वितीय,तर परशुराम वि मं., ज्युनिअर कॉलेज गगनबावडा,  –तृतीय
विभाग ब गट मधून माध्यमिक विद्यालय सांगशी प्रथम, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज शेळोशी  द्वितीय, तर दत्ताजीराव मोहिते पाटील , माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज तिसंगी—तृतीय असे क्रमांक आले.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.