प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

महिलांना उन्नती आणि संरक्षणाची हमी देणाऱ्या भाजपाचे संजय काका पाटील यांनाच साथ द्या : सौ. ज्योतीताई पाटील; मिरज तालुक्यात प्रचार दौरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : महिलांना उन्नती आणि संरक्षणाची हमी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनाच लोकसभा निवडणुकीत साथ द्या असे आवाहन सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी केले.
मिरज तालुक्यातील विजयनगर येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता नंदकुमार कोरे यांच्या निवासस्थानी सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी महिलांची बैठक घेतली.
ज्योतीताई पाटील म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीने महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीची तसेच संरक्षणाची हमी दिली आहे. गेल्या दहा वर्षात महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत, त्यामाध्यमातून महिलांना सक्षम करण्यात आले आहे. म्हणून भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये साथ द्यावी.
यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुमनताई खाडे, सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या ज्योतीताई कांबळे, विजयनगर सरपंच प्रियांका माळी, उपसरपंच सारिका कोरे यांच्यासह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.