प्रतिष्ठा न्यूज

मालमोटारीच्या अपघातात तरूण जागीच ठार

प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : विजापूर – गुहागर या राष्ट्रीय मार्गावर जत शहरातील तांबोळी हॉस्पीटल जवळ मालमोटारीने धडक दिल्याने फिरण्यास गेलेला तरूण सतीश गेनाप्पा शिंदे (३१, रा. सातारा रोड, जत) हा जागीच मयत झाला. ही घटना गुरूवारी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
सतीश शिंदे हा आपल्या पत्नी सोबत पहाटे फिरण्यास गेला होता. परत घराकडे चालत येत असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या माळमोटारीने धडक दिल्याने शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. यात मार लागल्याने त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. चालकास जत पोलीसांनी अटक केली आली असून याबाबत अपघाताची नोंद झाली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.