प्रतिष्ठा न्यूज

तासगावात पालिका प्रशासनाकडून हॉटेलसह २५ ठिकाणची तपासणी.. अन्यथा परवाना रद्दचा प्रस्ताव पाठवणार-मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव करांचे आरोग्यहित डोळ्यासमोर ठेवून तासगाव नगरपरिषद प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे.गेल्या दोन दिवसात शहरातील हॉटेलसह इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या सुमारे २५ ठिकाणची तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी त्रुटी आढळलेल्या काहींना नगरपरिषदेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या असून सुधारणा न झाल्यास परवाना रद्दचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती  मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.शहरात प्रमुख मार्गासह इतरत्र अनेक हॉटेल तसेच इतर खाद्यपदार्थांची ठिकाणी आहेत.या ठिकाणी खवैय्यांची अधिकची गर्दी पहावयास मिळते तर तासगावकरांचे आरोग्य हित डोळ्यासमोर ठेवून नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासन पथक गेल्या दोन दिवसापासून एक पाऊल पुढे टाकत रस्त्यावर उतरले आहे.या पथकात कार्यालयीन अधीक्षक धनश्री पाटील,आस्थापना प्रमुख प्रियांका भोसले,वरिष्ठ लिपिक राजू माळी,आयुब मणेर,वैभव गेजगे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या पथकाने शहरातील शहरातील सर्व हॉटेल,बेकरी, खाद्यपदार्थ विकणारे हातगाडे,नाष्टा सेंटर या ठिकाणी भेट दिली आहे.यावेळी पथकाने संबंधित व्यवसायिकांना स्वच्छतेबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत,तसेच पिण्याचे पाणी योग्य आहे का गॅस सिलेंडरचा वापर योग्य आहे का किचनमध्ये पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तेल व इतर पदार्थ योग्य आहेत का यासह इतर बाबींची तपासणी केली आहे.
अन्यथा परवाना रद्द चा प्रस्ताव पाठवणार मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील…यावेळी काही व्यवसायिकांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना या पथका मार्फत देण्यात आल्या आहेत,ज्या ठिकाणी काही त्रुटी आढळून आले आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून अस्वच्छता असुरक्षितता या बाबीवर दिलेल्या मुदतीत सुधारणा न केलेस त्यांचे परवाने रद्द करणे बाबतचा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासन विभागाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.