प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात ग्रीन क्लबचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ग्रीन क्लब ची स्थापना करून त्याचे उद्घाटन आनंदी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ आर एस आडनाइक यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव व प्रभारी प्राचार्य डॉ व्ही एस पाटील होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रीन क्लब समन्वयक डॉ. एस.एस. पानारी यांनी केले, एनएसएस समन्वयक प्रा ए एस कांबळे यांनी आभार मानले. प्रा.डी के पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष प्रा सतीश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले यावेळेस प्रा.ए एस जमादार ,प्रा एच एस फरास, प्रा घाटगे एस एस, प्रा.सरनोबत आर आर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.