प्रतिष्ठा न्यूज

जूनी पेंशन योजना मागणीस माजी मुख्यमंत्री ना.अशोक चव्हाण यांचा जाहीर पाठिंबा

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.२० : शिक्षक मित्र परिवाराचे संकल्प प्रतिष्ठान यांनी गेल्या 14 मार्च पासून पेन्शनच्या बेमुदत संपात सक्रिय सहभाग नोंदवून दररोज एक प्रतिकात्मक दृश्य करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु शासन अजून तरी पेन्शन लागू करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही म्हणून आज संपाच्या सहाव्या दिवशी साक्ष्यात पंढरपूरचा विठ्ठल अवतरला असून सोबत संत गाडगे महाराज व संत तुकाराम महाराज पेन्शन साठी याचना करत असताना मोर्चेकऱ्याने आता तरी विठुरायाचे ऐकून पेन्शन लागू करावी यासाठी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालया समोर पेन्शनचे कीर्तन सादर केले.
 संकल्प प्रतिष्ठानचे संकल्पक बालाजी बामणे यांच्या संकल्पनेतून पेन्शन मिळवण्यासाठी संपाच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कल्पकता वापरून शासनाचे लक्ष वेधून घेण्याच्या सतत प्रयत्नात असतात, त्यातूनच संकल्प मित्र पोतराज फेम महेंद्र अंबुलगेकर यांनी विठ्ठलाचे व संत गाडगे महाराज यांच्या वेश्यात संकल्प मित्र पोतराज,मसण जोगी, Nps चे भूत फेम उदयकुमार देवकांबळे तर सुरुवातीपासून पोतराज, मसणजोगी व Nps च्या भुताची वेशभूषा तयार करणारे मेकअप आर्टिस्ट व संकल्प मित्र प्रशांत भिंगोले हे संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूष्यात स्वतःच्या सौभाग्यवतीला पेन्शन मिळावे म्हणून कीर्तन करत आहेत सोबत टाळकरी संकल्प मित्र मुनेश सिरसीकर,शिवा वाघमारे, बेंग्या महाराज यशपाल जोंधळे, संघपाल वाठोरे,प्रभाकर मुरकुटे, रमाकांत वडजे, प्रा. गुंडले, नामदेव नाईक, जि.एन जाधव, कंधारे, गजानन उजलंबकर, राहुल नरवाडे हे टाळ मृदंग वाजवत होते. तुळशी वृंदावन घेतलेले पाठबंधारे विभागाचे हेमलता चौडे ह्या होत्या.
  बेमुदत संपाच्या सहाव्या दिवशी संकल्प प्रतिष्ठानचे संकल्प मित्र प्रल्हाद राठोड, तस्लिम शेख,दिगंबर शेळके, मनोहर बसवंत,माधव पचलिंग,वैजनाथ पसरगे, टोम्पे, रामेश्वर मुळे,लक्षण राठोड, कंधारकर, सतीश भंडारे, सुनिल मुत्तेपवार, संकल्प नारी स्मिता पाटील,रूपांजली नामवाड,अफ्रिन मॅडम, पठाण मॅडम,अधिवासी विभागाचे स्वामी मॅडम आदि सहभागी होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.