प्रतिष्ठा न्यूज

चिंचणीच्या विठ्ठलराव पागे विद्यामंदिरात 24 वर्षांनी एकत्रित आले विद्यार्थी विद्यार्थिनी…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:चिंचणी येथील विठ्ठलराव पागे विद्यामंदिरात तब्बल 24 वर्षांनी दहावी 2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठया उत्साहात पार पडला.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनींनी  सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी शिक्षकां सहित सर्वांना फेटे बांधण्यात आले. स्नेह मेळाव्याची सुरुवात शाळेची बेल देऊन करण्यात आली.त्यानंतर राष्ट्रगीत, प्रार्थना, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. हयात नसलेले शिक्षक, विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित शिक्षकांचा एक झाड, शाल, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी शिक्षकांकडून सर्वच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह तसेच गुलाबपुष्प देण्यात आले.या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने विना पाटील व विवेक पाटील कोल्हापूर यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.स्वप्नगंगा बाबर हिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्या बद्दल तिचाही सह कुटुंब सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व बेल वाजवून करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचें प्रमुख पाहुणे एस कें कोरे सर, प्रमुख उपस्थिती जाधव सर,माथाडी सर, देशमुख सर, यादव सर, गोखले सर, जे जे माने सर,  बी वाय पाटील मॅडम, पाटील मॅडम, व मान्यवर होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन योगेश पाटील,अरविंद माने,तेजस भस्मे,सुनील पाटील, राहुल शितोळे,रमेश संदे,प्रशांत पाटील, नामदेव चव्हाण, जगदीश जाधव, गणेश जाधव, पल्लवी डोंगरे, रुपाली पाटील, वैशाली पाटील, स्वप्नगंगा बाबर, प्रियांका पाटील, वैशाली खराडे, मेघा पाटील, सुवर्णा माने, यांनी केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.