प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूल सीबीएसई मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंब्रिज स्कूल सीबीएसई मिरज येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी आदरणीय माणिक वाघमारे लाभले. त्यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या प्रारंभी मुलांनी विविध गटातून मार्च पास सादर केले. त्यानंतर विविध गटातून मुलांनी भारतातील वेगवेगळ्या राज्याचे सांस्कृतिक नृत्याचे सादरीकरण केले. मुलांचे एकूण चार गट तयार करण्यात आले होते त्यापैकी रेड हाऊस, ग्रीन हाऊस, ब्लू हाऊस, येलो हाऊस प्रत्येक राज्याचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारे नृत्य सादर करून सगळ्यांची मने जिंकली
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य हे द्विगुणित केले पाहिजे. ज्यामुळे आपल्याला त्याचा मनापासून आनंद घेता येईल. शासकीय नोकरीसाठी खेळामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या मुलांना पाच टक्के आरक्षण शासनाकडून असते. राष्ट्रीय खेळ खेळत असताना खेळाडूंना काही दुखापत झाली असता तो शासनाकडून तीस लाखापर्यंत खर्च केला जातो. तसेच राष्ट्रीय खेळामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केली असेल तर शासनाकडून आपल्याला भरघोस असे आर्थिक मदत मिळत असते. म्हणून मुलांनी खेळामध्ये सहज सहभागी होऊन आपले करिअर करावे व आपले भविष्य घडवावे असेही त्यांनी मुलांना सांगितले.
या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी प्रमुख माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच समन्वयक सतीश पाटील, शाळा अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयक अश्विनी येलकर, पूर्व प्राथमिकच्या समन्वयक वंदना डोंगरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक अतुल जाधव, राजेश कुरणे, चंद्रकांत कांबळे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार मनोज लिंबीकाई यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.