प्रतिष्ठा न्यूज

तासगावातील वाहतूक कोंडी सुटेना.. गाड्यांच्या दिवसभर लांबच लांब रांगा..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरातील वाहतूक कोंडी आता तासगाव कराना नित्याची झाली आहे.शहरातून विटा -सांगली आणि तासगाव – कराड असे दोन राज्यमार्ग जात असून,या राज्यमार्गावर सांगली नाका,तासगाव बसस्थानक चौक,विटा नाका,चिंचणी नाका,वंदे मातरम् चौक सिद्धेश्वर चौक,भिलवडी नाका असे प्रमुख चौक येतात,या चौकांमध्ये दुचाकी,चारचाकी वाहनांची वाहतूक कोंडी नेहमी ठरलेली असते. अनेक वेळा जड वाहनाच्या वर्दळीने वाहतूक कोंडी होऊन वाहतूक दिवस दिवसभर थांबतें.मात्र,अशा वेळी वाहतूक पोलिसांच्या कमी संख्येमुळे शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था सुरळीत नसल्याने दुतर्फा वाहने लागत असल्याचे दिसत आहे.याचा परिणाम  रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांसाठी दहा फुटांहून कमी जागा राहते.शहरातील आठवडा बाजार सोमवार व गुरुवारी भरतो.यादिवशी शहरातील वाहतूक कोंडीमुळे वाहतूक संपूर्ण दिवसभर ठरलेली असते.
कुठल्याही शहर विकासात प्रामुख्याने शहरातील अंतर्गत रस्ते,पार्किंग व्यवस्था,रुंद रस्ते विकास या गोष्टींचा उल्लेख केला जातो.मात्र तासगावमध्ये या सर्व गोष्टींची नेहमीच कमतरता राहिली आहे.त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत तासगाव आजही पंधरा वर्षे मागे असल्याचे बोलले जाते.आगामी सर्वच निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.
जो लोकप्रतिनिधी शहर विकास आणि शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढेल,त्यालाच शहरातील मतदार साथ देतील,असं सर्वसामान्य मतदा्रांकडून बोललं जात आहे.
शहराच्या विकासाचे हित डोळ्यासमोर ठेवून २००६ च्या निवडणुकी पासून रिंगरोडचे हाती घेतलेले रखडलेले आहे.विटा,खानापूर,आटपाडी या ठिकाणी जाणारी वाहने तासगाव मध्ये न येता ती थेट बाहेरुन जावीत यासाठी हा रिंगरोड महत्चाचा ठरणार होता,मात्र अंतर्गत गटबाजीमुळे व लोकांना या रस्त्यांचे महत्व समजावण्यात सत्ताधारी कमी पडल्याने रस्त्याचा प्रश्न आजअखेर प्रलंबित पडलेला आहे.शहरात एकही रस्ता एकेरी नाही,रस्त्याच्या दुतर्फा दुकाने,दवाखाने,शाळा असल्याने नेहमी वर्दळ असते.मात्र यातच काही बहाद्दर बिनभोबाट रस्त्यावर वाहने लावून कामाला निघून जातात.यामुळे अनेकदा तास तासभर वाहतूक खोळंबली जाते.मात्र हा विषय पालिका प्रशासन अथवा पोलिस प्रशासन गांभियनि घेताना दिसत नाही.गणपती मंदिर,छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक,गुरूवार पेठ, सिध्देश्वर चौक,विटा नाका,सांगली नाका,भिलवडी नाका या प्रमुख चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न बिकट असून प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य लोकांकडून होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.