प्रतिष्ठा न्यूज

प. पू. श्री. सदगुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या ९९ व्या पुण्यतिथी महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प. पू. श्री. सदगुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या ९९ व्या पुण्यतिथी महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. महाराजांचे हे शताद्वी पुण्यतिथी वर्ष असून, यानिमित्ताने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कैवल्यधाम प. पू. सद्गुरु कोटणीस महाराजांच्या शताद्वी वर्षानिमित्त ५ जानेवारी ते १३ जानेवारी अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गुरुवार ५ रोजी सायंकाळी पुणे येथील सौरभ नाईक यांचा गायन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांना तबला साथ प्रणव गुरव व हार्मोनियम साथ स्वरूप दिवाण यांनी केली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. योगीराज गोसावी, सांगली अर्बन बँकेचे चेअरमन गणेश गाडगीळ, रामविश्वास डेअरीचे विश्वासराव गवळी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे, नगरसेवक अभिजीत भोसले, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, अनिल कोकरे, किरण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्री गुरुनाथ कोटणीस महाराज, धनंजय कोटणीस, संजय कोटणीस आदींसह भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शुक्रवार ६ रोजी पहाटे ५ ते ७ या वेळेत दिपोत्सव असून, यावेळी माहिती आयुक्त उदय माहूरकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पुणे येथील हृषिकेश बडवे यांचे गायन होणार असून, त्यांना प्रणव गुरव तबलासाथ व स्वरुप दिवाण हे हार्मोनियम साथ करणार आहेत. तर दुपारी २ वाजता शताब्दी पुण्यतिथी महोत्सवी वर्षाचा शुभारंभ व संकेत स्थळांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती कोटणीस यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.