प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या ताफ्यात चार फायर फायटर सह पहिली इलेक्ट्रिक गाडी दाखल : महापौर आयुक्तांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात चार नवीन फायर फायटरसह पहिली इलेक्ट्रिक गाडी दाखल झाली आहे. या नव्या वाहनाचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आणि मनपा आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते  लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेने पर्यावरण पूरक पाऊल उचलत माजी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत आणि एनकॅपच्या माध्यमातून पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी करीत पर्यावरण आणि वसुंधरा रक्षणाचा संदेश देण्यात आला.

महापालिकेने 25 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत शासन आणि महापालिका निधीतून चार फायर फायटर, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दोन जेटिंग रॉडिंग ग्राबिंग वाहने व चार ट्रॅक्टर , नगर रचना विभागासाठी एक कार आणि एन कॅप मधून प्रायोगिक तत्वावर पहिली इलेक्ट्रिक कार अशी एकूण 3 कोटी 10 लाखाची वाहने खरेदी करण्यात आली आहेत. या नव्या वाहनाचे स्टेशन चौकात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आणि मनपा आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते  लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, सभागृह नेत्या भारती दिगडे, उपआयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे,अनारकली कुरणे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुबराव मद्रासी, विनायक सिंहासने, उत्तम साखळकर, संतोष पाटील, करन जामदार, लक्ष्मण  नवलाई, संजय यमगर, तोफिक शिकलगार, जमीर कुरणे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव , सहायक आयुक्त सहदेव कावडे, सावता खरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

माजी वसुंधरा अंतर्गत एनकॅप मधून पहिली इलेक्ट्रिक कार
माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेने एनकॅप निधीमधून प्रायोगिक तत्वावर पहिली ई कार खरेदी करीत पर्यावरण पूरक निर्णय घेतला आहे. यामुळे माझी वसुंधरा योजनेची जनजागृती करण्यासाठी ई कारचा अधिक वापर होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.