प्रतिष्ठा न्यूज

गृहमंत्र्याच्या सूचनेनुसारच मराठा आंदोलनाकावर जनावराप्रमाणे लाठीहल्ला : राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांचा आरोप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनाच्या अंतरवाली सराटी गावात शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमच्या मराठा बंधूंनी उपोषण सुरू केले होते. शांततेच्या मार्गाने सुरू असणाऱ्या या आंदोलनास पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आडवे तिडवे प्रश्न विचारून व त्यांना भडकावून इंग्रजी राजवटी जुलमी प्रमाणे ज्या पद्धतीने जनावरांना मारले जाते त्याच पद्धतीने त्यांच्यावर महाराष्ट्राचे ब्रिटिश पद्धतीचे व मराठा समाजाला आरक्षण मिळो न देण्यासाठी कायम मराठा समाजाच्या विरोधात असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार लाठीहल्ला करून जखमी केले. रक्षण करणारे पोलीसच गृहमंत्र्याच्या सूचनेनुसार भक्षक बनू लागले तर भविष्य काळामध्ये मराठा समाज कायदा हातात घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही याची दखल पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणाऱ्या ब्रिटिश राजवटीचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंद करून ठेवावी. महाराष्ट्रातील व देशातील होणाऱ्या निवडणूक मध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल. यावरून राज्यांमध्ये व देशांमध्ये हुकूमशाही आणायचे आहे याचे हे ठळक उदाहरण आहे. अशी माहिती मराठा स्वराज्या संघाचे राज्यप्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार मध्ये म्हणले आहे व जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाकावर झालेल्या अमानुष्य लाठी हल्ल्याचा मराठा स्वराज्य संघाच्या वतीने तीव्र निषेध केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.