प्रतिष्ठा न्यूज

सिडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे व अपंग सेवाभावी संस्था सावळज यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : दि. २५ : सावळज (ता. तासगाव) येथे गुरुवार दि. 25 रोजी सिडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांच्या सी एस आर फंडातून दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअर, वॉकर, कुबडी, आधार काठी, अंधकाठी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास सावळज व परिसरातील दिव्यांग बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विश्वास तात्या निकम यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी श्री सतीश पाटील व श्री शितल पाटील उपस्थित होते यावेळी उपस्थिताना सतीश पाटील शीतल पाटील व अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राहुल कलाल यांनी मार्गदर्शन केले यावेळी दिव्यांग बांधवांनी ही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास दिलीप पाटील, मनोज निकम, पुनम पाटील, नंदकुमार भाऊ कापसे, दादा तोडकर व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार राजेंद्र कलाल यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.