प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत‘स्मार्ट सिटी’, विमानतळ कानाही? खासदार विशालपाटील– अर्थसंकल्पारुन संसदेत जोरदार हल्लाबोल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही. आमच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात तरतूद का करण्यात आली नाही. टेंभू आणि म्हैसाळ विस्तारीत योजनांसाठी ए.आय.बी.पी. योजनेतून निधी का देण्यात आला नाही, असा सवाल करत खासदार विशाल पाटील यांनी आज संसदेत हल्लाबोल केला. अर्थसंकल्पावरील भाषणात त्यांनी महाराष्ट्रावरील अन्यायाचाही पाढा वाचला.

ते म्हणाले, ‘‘सांगलीला अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. दीड तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्राचे नाव घेतले गेले नाही. आसाम, बिहारमधील महापुराचा उल्लेख झाला. महाराष्ट्रातील महापूराच्या नुकसानीवर त्या बोलल्या नाहीत. सांगली मतदार संघाची अपेक्षा आहे स्मार्ट सिटीत येण्याची. इथे विमानतळाला निधी दिला नाही. बिहारमधील सिंचनासाठी तुम्ही निधीची तरतूद केली, मात्र टेंभू, म्हैसाळ योजनेचा उल्लेख करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही. कराचा ३७ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो, भारताच्या जीडीपीचा १४ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो. पाच ट्रीनियन इकॉनॉमीची स्वप्ने पाहताना त्यात एक ट्रिलीयन वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी भारताचा विकास अशक्य आहे.’’

*महाराष्ट्र माझा*
विशाल पाटील यांनी महाराष्ट्र गीताच्या ओळी गात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी खासदारांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, ‘‘दारीद्र्यांच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा. इतिहास साक्षी आहे, दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र घेत होता, घेत आहे आणि घेत राहील. आर्थिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रात हे महाराष्ट्राने करून दाखवले आहे. केंद्रातील सरकार सलामत राखण्याचे काम तुमच्या १७ खासदारांनी केले आहे. तुम्ही आमच्याकडे पाहू नका, पण त्यांच्याकडे पाहून तरी निधी द्या. मला त्यांचे हसरे चेहरे पाहून काही ओळी सुचतात, ‘आज तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या दर्द है जो छुपा रहे हो.’ त्यांना चिंता आहे, त्यांच्या मतदार संघात जाऊन ते सांगणार काय? अर्थसंकल्पातून काय मिळाले?’’

ते म्हणाले, ‘‘कुबड्या घेऊन चालणारे हे सरकार आहे. ते देश बुडवू नये, एवढी अपेक्षा आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई नियंत्रण, ईपीएस पेन्शन, भूमीहीन शेतकरी सन्मान योजना , खते व बियाण्यांवर जीएसटी नको या सगळ्या मागण्या तुम्ही अमान्य केल्या. फूड सबसिडीवरील निधी कमी केला. खतांचे अनुदान कमी केले. घरांसाठी फक्त ५ टक्के जादा तरतूद केली. नव्या योजनांचा फक्त उल्लेख करता, त्या काय आहेत, ६० हजार कोटी कुठे जाणार, हे स्पष्ट का सांगत नाही. बोलाचीच कडी, बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोण झाला, अशी अवस्था आहे. ज्या राज्याचा जीडीपी घसरला तिथे भाजप हरला आहे. असेच अर्थ धोरण राहिले तर भाजपचे पतन निश्‍चित आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते हरियाणा आणि महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, हे नक्की आहे.

ट्रेलर बगवास,
पिक्चर फ्लॉप

विशाल पाटील यांनी थेट अर्थमंत्र्यांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पावर खूष असणारे काही खासदार मला म्हणाले, हा फक्त ट्रेलर आहे, मात्र अडचण अशी आहे की ट्रेलर पाहून पिक्चरचा अंदाज लागत नाही. मी परवा एक ट्रेलर पाहून बायकोसोबत सिनेमाला गेलो, अर्था तासात कंटाळून बाहेर पडलो. अर्थसंकल्पाची अवस्था अशीच आहे. कारण, या अर्थसंकल्पाचा दिग्दर्शक हीच अडचण आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.