प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुक्यातील; मारतळा-उमरा सह सर्वत्र जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती मोठया उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील मारतळा  येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आज दि.12 जानेवारी 2023 रोज गुरूवारी राष्ट्रमाता- राजमाता माँ जिजाऊसाहेब यांचा 425 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम माँ जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन गावचे सरपंच व उपसरपंच यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून  करण्यात आले, व जिजाऊ वंदना घेण्यात आली. तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व श्री साईबाबा हायस्कूल मध्ये स्वराज्य जननी  माँ जिजाऊसाहेब जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची 160 व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शालेय मुलांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
    यावेळी सरपंच बालाजी बिचेवाड, उपसरपंच भास्करराव ढगे, रमेश ढेपे, साईबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक एकनाथ मोरे, जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक व्यंकट मुगावे, दै. सकाळचे बातमीदार गणेशराव ढेपे, गणेश पालदेवार, रवी ढगे, बालाजी प्यारलावार, प्रल्हाद पवार, देवबा होळकर, उज्वला जोशी, माधुरी मलदोडे, जयश्री बोराळे, आशा ढगे, त्रिशला शिंदे, जयश्री जाधव आदीसह शिक्षक, कर्मचारी, गावातील नागरिक, शाळेतील विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
    तसेच यावेळी उमरा परिसरातील सर्वच गाव, तांडा वस्ती ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.