प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र शासनाच्या कंत्राटी धोरणाच्या विरोधात शिक्षक सेनेचे “ढोल बजावो” आंदोलन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- जिल्हातील तमाम शिक्षक बंधू भगनिंनो सरकारने महाराष्ट्रात नोकर भरतीसाठी कंञाटी पध्दत लागु केली आहे. व राज्यातील 62000 जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्यात निर्णय घेणार आहेत. यामुळे आपल्याला भविष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागणार आहे शासनाच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शिक्षक सेना नांदेडच्या वतीने दि. 20 सप्टेंबर 2023 रोज बुधवार सकाळी 11 ते 5 या वेळेत जिल्हा परिषद नांदेड समोर एक दिवसीय “ढोल बजावो” आंदोलन करण्यात येणार आहे.
तेंव्हा जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना या आंदोलनात सहभागी व्हावे. आपली एक रजा  आपल्या व महाराष्ट्रातील हजारो मुलांच्या व जिल्हा परिषद शाळाच्या भविष्यासाठी आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष पाटील अंबुलगेकर, सरचिटणीस – रवी बंडेवार, जिल्हा संघटक – प्रकाश कांबळे, सल्लागार- शिवाजी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.