प्रतिष्ठा न्यूज

बिंदू नामावलीच्या नावाखाली खाजगी शाळांचे वेतन रोखण्याचे आदेश रद्द करा- जिल्हा शिक्षक महासंघाची मागणी

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक अनुदानित- विनाअनुदानित शाळांचे बिंदू नामावलीच्या अद्यावत करण्याच्या नावाखाली माहे सप्टेंबर 2023 चे वेतन थांबविणे हे शिक्षकावर अन्याय करणारे आहे. तेंव्हा संबंधित शाळांचे वेतन करण्याचे आदेश निर्गमित करण्यासंदर्भात शिक्षक नेते तथा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष- हरिभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना भेटून निवेदन दिले.
एखाद्या संस्थेने बिंदू नामावली नाही केल्यास त्यांचे वितनेत्तर अनुदान रोखण्यात येते, ही बाब शिक्षण विभाग कार्यालयास माहिती असूनही ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांचे वेतन थांबविणे योग्य नसल्यामुळे सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक अनुदानित- विनाअनुदानित शाळेची बिंदू नामावली अद्यावत न केल्यास माहे- सप्टेंबर 2023 चे वेतन स्थगित करण्याचे आदेश आपल्या कार्यालयाने काढलेले कितपत योग्य आहेत. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे कायम समायोजन करण्याकरीता अनेक वेळा कार्यशाळा (कॅम्प) आयोजित केले जातात तेंव्हा शिक्षण विभागाकडून कधीही बिंदू नामावली रोस्टर प्रमाणे कायम समायोजन केले जात नाही. बिंदू नामावली च्या नावाखाली शिक्षकांचे माहे- सप्टेंबर 2023 चे वेतन सणासुदीच्या दिवसात न काढल्यास शिक्षकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
माहे- सप्टेंबर वेतन स्थगित न ठेवता सदरील चुकीने काढलेले आदेश रद्द करून वेतन करण्यासंदर्भात दुसरे आदेश तात्काळ काढून आपल्या कडुन होणारी शिक्षकावरील उपासमारी थांबवावी.
वेतन सुरू करण्याचे आदेश न काढल्यास महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने साखळी उपोषण करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.