प्रतिष्ठा न्यूज

शासकीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये चंपाबेन महिला महाविद्यालयाचे यश

प्रतिष्ठा न्यूज/ दिपक दुधगावकर
सांगली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत *शासकीय क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजीत खामगाव ता. बार्शी जि. सोलापूर* आयोजित *19 वर्षाखालील मुली* शासकीय शालेय *राज्यस्तर व्हॉलीबॉल* स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे,औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक व कोल्हापूर या आठ विभागांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये मातृसंस्था श्री गुजराती सेवा समाज सांगली संचलित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयालय सांगलीच्या व्हॉलीबॉल संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत नागपूर व पुणे या विभागासमवेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत व तृतीय क्रमांक प्रविण्यासाठी लातूर विभाग संघावरती उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सरळ 3/0 सेटनी विजय मिळविला व या *शासकीय शालेय 19 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक विजेतेपद चषक प्राप्त केला.* या स्पर्धेमध्ये कु.राणी आंबी कर्णधार, कु.प्रतीक्षा कुमावत उपकर्णधार, कु. मैथिली बेळगावे, कु.कीर्ती सोलांकूरकर, कु.मधुरा हवालदार, कु.रिया पाटील कु.श्रावणी कांबळे, कु.श्वेता महाजन यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यांना कु. ऋतिका कदम,कु. सायली पाटील कु. प्रणवी पाटील कु. हर्षदा हिरूकडे यांची चांगली साथ लाभली.
*यशस्वी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !*
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना मातृसंस्था श्री गुजराती सेवा समाज सांगलीचे अध्यक्ष मा.श्री कांतीभाई वामजा, उपाध्यक्ष मा. श्री शरदभाई शाह, सचिव मा. श्री दिपकभाई शाह, सहसचिव मा. श्री ललितभाई संग्राम  खजिनदार  मा. श्री रितेश शेठ तसेच महाविद्यालय विकास समितीतील सदस्य मा.श्री मुकेशभाई पटेल, मा.श्री अरुणभाई शेठ, मा.रमनिक दावडा, मा. श्री प्रसाद शाह मा.रौनक शाह, मा.श्री स्वप्निल शाह मातृसंस्था श्री गुजराती सेवा समाज सांगली संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन खिलारे महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक प्रा.श्री.दिपक ज्ञानदेव राऊत संघ व्यवस्थापक सौ. वर्षा गोरखनाथ सुखदेव यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.