प्रतिष्ठा न्यूज

संविधानच जनतेला शांती, संरक्षण व समृध्दी देते : काँग्रेस भवनमध्ये संविधान दिन कार्यक्रमात पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. २६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन जनतेला शांती, संरक्षण व समृध्दीची हमी दिली. शंभर टक्के संविधानावर देश चालला तर निश्चितच भारत बलाढ्य व विकसीत बनेल. आज घराघरात व मनामनात संविधान पोहोचवणं आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्य व लोकशाही बळकट करण्याचे मोठे आव्हान देशासमोर उभे आहे. संविधानातील स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे तसेच धर्मनिरपेक्ष विचार, व्यक्तीची प्रतिष्ठा यांचीजपणूक करण्यासाठी व्यापक प्रबोधन करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.
प्रारंभी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान अर्पण करतानाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी संविधान प्रस्तावना वाचन केले व सर्वांनी सामुदायिक वाचनाने अनुकरण केले.
यावेळी शाहीन शेख यांनी सध्या देशासाठी संविधान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले व संविधानाशिवाय देशाचे अस्तित्व नगण्य आहे त्यासाठी संविधानकेंद्रीत कारभार हेच आपले अस्तित्व व अस्मिता शाबूत ठेवून शकते.’असे सांगितले.
यावेळी आशिष कोरी यांनी काँग्रेस कार्यालयासाठी संविधान प्रस्तावना डिजिटल फलक भेट दिले त्याचे अनावरण पृथ्वीराज पाटील बाबा व शाहीन शेख यांच्या हस्ते झाले. तसेच २६नोव्हेंबरला मुंबईत अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पाटील बाबा, शाहीन शेख, अजित ढोले, अरुण पळसुले प्रा. एन.डी.बिरनाळे, देशभूषण पाटील, अमित बस्तवडे, सुशांत जाधव, आशिष चौधरी, विक्रम कांबळे, निखिल गवारे, प्रतिक्षा कांबळे, अर्जुन मजले, आयुब निशाणदार, पैगंबर शेख, राजेंद्र कांबळे, नामदेव पठाडे, मिना शिंदे, सीमा कुलकर्णी, शमशाद नायकवडी, सुरेश गायकवाड विश्वास यादव, विठ्ठलराव काळे, श्रीधर बारटक्के, अमोल पवार, मंदार सुतार,शैलेंद्र पिराळे, नंदा खंदारे, भाऊसाहेब पवार बाबगोंडा पाटील व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.