प्रतिष्ठा न्यूज

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोहा तालुक्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्याने लोहा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि 15 ऑगस्ट 2022 रोज सोमवारी करण्यात आले होते.
वाका फाटा तेथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उदघाटन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांच्या हास्ते करण्यात आले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कदम. शिवाजी हंबर्डे. लोहा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे शहर उपाध्यक्ष बालाजी देशमुख लोकसभा उपाध्यक्ष परमेश्वर – खोसे, पवन पाटील सिरसाट- उमरा, अभि सिरसाट, राजु शिंदे, भास्कर सोमवारे, दिंगाबर ढगे, अनिल हंबर्डे, हनुमंत मसेकर, मणिक हंबर्डे, विकास पांचाळ, ओमकार ढगे, नागेश मोरे, श्याम गाढे, सुनील शिंदे, सुरेश सिरसाट, गजानन ढगे, कृष्णा हंबर्डे,आनंदा भालेराव आदी ची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्यध्यक्ष अंकूश पाटील कोल्हे यांनी केले होते. या रक्तदान शिबिरासाठी नांदेड येथील गुरूगोविंदसिंघ ब्लड बँकचे डॉ.प्रवीण सर व त्यांच्या टिमने सहकार्य केले.
यावेळी 117 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.