प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या वैद्यकीय क्षेत्रात चाललंय काय

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहरात गेल्या पंधरा दिवसात वैद्यकीय क्षेत्रात दोन मोठ्या खळबळ जनक घटना घडल्या आहेत.शहरात नुकताच एका हॉस्पिटल मधून नवजात शिशुचे अपहरणाची घटना घडली होती. अतिशय कमी वेळात या गुन्ह्याची पोलीस प्रशासनाने उकल करून गुन्हेगाराना ताब्यात घेतले.परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगार सापडले,परंतु हॉस्पिटलचा निष्काळजीपणा हा नुसता माफी मागून संपणार आहे काय,असा सवाल तासगावकर जनतेला पडला आहे.त्या नवजात शिशूचे नशीब बलवत्तर म्हणून अघटित घटना घडली नाही,त्यामुळे हॉस्पिटलचा निष्काळजीपणा हा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो.याप्रसंगी तासगावकरांनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा होता.ते प्रकरण अजून संपत नाही तोवर एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरचे त्यांच्याच हॉस्पिटल मधील शिकाऊ डॉक्टर सोबतचे प्रेमप्रकरण सुरु असल्याचे सध्या शहरात चर्चेचा विषय झाला आहे.त्यामुळे सध्या तासगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात नेमक काय सुरु आहे असा प्रश्न तासगावच्या लोकांना पडला आहे.डॉक्टर म्हणजे प्रति देव असतो अशी भावना ठेवून डॉक्टरांच्या वर विश्वास ठेवून लोक त्यांच्या कडून उपचार करून घेत असतात.या अशा प्रकरणामुळे डॉक्टरांची जनमानसातली प्रतिमा मलीन होताना दिसत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.