प्रतिष्ठा न्यूज

तासगावांत नागपंचमी सण उत्साहात : नागराज मूर्तींच्या सवाद्य मिरवणुकीने लक्ष वेधले

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहरासह परिसरात आज मोठ्या उत्साहात नागपंचमी सण साजरा करण्यात आला.शहरासह विविध ठिकाणी नागराजांच्या मूर्तीचे सुहासिनीनी विधी पूर्वक पुजन केले.नागराजांच्या सवाद्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले.तर नागपंचमी निमित्त नाभिक समाज बांधवांनी आपले व्यवसाय दिवसभर बंद ठेवले होते.तासगाव शहरात प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षी ही आज नागपंचमी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.नागपंचमी निमित्त मानकरी असलेले नाभिक समाज बांधवांनी नागराज गल्ली येथे सोमवारी रात्रीपासूनच नागराजांची मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले होते.रात्री उशिरा नागराजांच्या दोन मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण झाले,यानंतर या मूर्तीची समाज बांधव मधुकर काळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.यासाठी नाभिक समाज बांधव सदानंद गायकवाड,लक्ष्मण उर्फ काका खंडागळे,सुदाम खंडागळे,मोहन खंडागळे,लक्ष्मण गायकवाड,मधुकर काळे,सुभाष उर्फ बाबू खंडागळे, राहुल खंडागळे,प्रशांत खंडागळे,पवन गायकवाड,विनायक कदम,गोरख गायकवाड,निलेश गायकवाड,नितीन गायकवाड,मंथन खंडागळे,सार्थक गायकवाड,ऋषिकेश गायकवाड, आराध्य गायकवाड,आदींनी परिश्रम घेतले.आज सकाळी या मूर्तींचे नागराज गल्ली येथील सुहासिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले.तद्नंतर नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून नागराजांच्या मूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मूर्तींचे मोठ्या उत्साहात स्वागत करून सुहासिनींनी विधिपूर्वक पूजन केले. शहरातील सोमवार पेठ – दाणे गल्ली येथे व गणपती मंदिर चौक येथे या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. येथे सायंकाळपर्यंत अनेक सुहासिनींनी पूजन केले.
सायंकाळी या दोन्ही मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.तसेच वरचे गल्ली येथेही नाभिक समाज बांधवांनी नागराजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.येथेही सुहासिनींनी गर्दी करीत विधीपूर्वक पूजन केले.नागराजांची प्रतिष्ठापना केलेल्या तिन्ही ठिकाणी नाभिक समाज बांधव थांबून होते. तसेच तालुक्यातील कवठे एकंद येथेही नाभिक समाज बांधवांनी नागराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती इथेही सुहासिनींनी मूर्तीचे विधिपूर्वक पूजन केले.नागपंचमी निमित्त परंपरेप्रमाणे यावर्षीही नाभिक समाज बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते तर नागपंचमी सणाचे हे सातत्य यापुढेही कायम ठेवण्याचा मानस नाभिक समाज बांधवांनी व्यक्त केला.
तासगाव येथील नाभिक समाज बांधवांचे वतीने बनवण्यात आलेल्या नागराजांची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेताना पंकज विनायक गायकवाड.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.