प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात 181 तर लोहा तालुक्यातील 28 गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात-थंडीत होणार उमेदवार व मतदार गरम

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : नांदेड जिल्ह्यात 181 तर लोहा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या गावात राजकीय जुळवाजुळव व डावपेचांमुळे वातावरण तापत आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक व खर्च करणाऱ्या उमेदवाराचा शोध काही गावात सुरूअसुन या थंडीच्या दिवसातही उमेदवार व मतदार गरम असल्याचे पहावयास मिळणार आहे.

लोहा तालुक्यातील रिसनगाव, हडोळाती-ज, सोनखेड, पारडी, पिंपरणवाडी, भेंडेगाव, मडकी- मडकेवाडी, वाळकेवाडी, पळशी, नामणी, खरबी, चिंचोली-पटी उस्मानगर, नांदगाव, कांजाळातांडा, कांजाळा, मंगरूळ, काबेगाव, मस्की, हिप्परगा- चितळी, बेरळी खु.,पोलेवाडी, घुगेवाडी, कदमाचीवाडी, दगडसांगवी, , हरणवाडी, लव्हराळ, नगारवाडी, लिंबोटी या गावात निवडणूक होत आहे.
याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरच्या 16,17,18, 23 व 24 या तारखेला या 28 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. तत्पूर्वी या सर्व ग्रामपंचायतमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, वडेपूरी-2, उमरा -4, सोनखेड-7,कलंबर4,सावरगाव-5,माळाकोळी-6,अशी 6 जिल्हा परिषद सर्कल मधील 28 ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.
18 नोव्हेंबर रोजी त्या- त्या गावात तहसीलदार हे अधिसूचना प्रसिद्ध करतील. 27 तारखेपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात असून, २ डिसेंबर शेवटची तारीख आहे. 5 डिसेंबर रोजी छाननी, 7 तारखेला नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
एकंदरीत थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने तालुक्यातील आजी व माजी आमदार, विविध पक्षाचे तालुकाध्यक्ष, सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.