प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील पहिल्या शोले महोत्सवास हजारोंच्या गर्दीने स्टेशन चौक फुलला : महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण माझी वसुंधरा अंतर्गत ए शाम मस्तानी सिंगिंग ग्रुप कडून आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संपूर्ण सांगलीकरांना उत्कंठा लागून राहिलेल्या आणि भारतातील पहिल्या शोले महोत्सवास सांगलीकर रसिकांनी भरभरून दात दिली. या शोले महोत्सवास सांगलीकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित लावत रसिकांच्या उपस्थितीने ऐतिहासिक स्टेशन चौक पुन्हा एकदा फुलून गेला. यावेळी तब्बल साडेतीन तास सांगलीकर रसिकांनी शोले चित्रपटातील थरार अनुभवला. याचबरोबर आनंदही लुटला. ये शाम मस्तानी सिंगिंग ग्रुपचे प्रमुख आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण, डायरेक्टर सोनाली केकडे आणि मालती डेव्हलपर्सचे प्रमुख रमाकांत घोडके यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण माझी वसुंधरा अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ये शाम मस्तानी सिंगिंग ग्रुप हा सांगलीतील नवोदित गायकांसाठी अल्पावधीतच नाव रूपाला आला आहे नवोदित गायकांना व्यासपीठ मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी हा ग्रुप सुरू केला आहे. या माध्यमातून अनेक नवोदित गायकांना आणि कलाकारांना त्यांनी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू केले सांगली ही कला पंढरी आहे आणि या कलापंढरीत कला जिवंत राहिली पाहिजे यासाठी दीपक चव्हाण हे प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून 5 मार्च रोजी सांगलीतील ऐतिहासिक अशा स्टेशन चौकात दीपक चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतातील पहिला शोले महोत्सव आणि बच्चन हिट्स गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सांगलीकरांनी भरभरून दाद दिलीच आणि हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती दाखवली. अनेक वर्षानंतर स्टेशन चौकात सांस्कृतिक वारसा जपणारा कार्यक्रम शोलेच्या माध्यमातून होत असल्याने सांगलीकरांनी याला प्रतिसाद दिला. शोले महोत्सवामध्ये शोले चित्रपटाचा इतिहास शोले चित्रपट हा व्हिजवली या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न दीपक चव्हाण सोनाली केकडे, सुहास फडतरे , मिलिंद बनसोडे नवीन संबोधी, रफिक भालदार , राखी शेंडगे, पोर्णिमा शेंडगे, रुपेश चंदनशिवे, अरिफ शेख विनोद साळुंखे, गिरीश लोहाना, गुरुजी कौसर मुजावर, तेजश्री गायकवाड, पूर्वा केकडे पार्थ केकडे ,आयुब ऐनापुरे, कबीर कुरणे, सूत्रसंचालक के आजेस यांच्यासह टीमने दाखवून दिला. शोलेतील प्रत्येक डायलॉग , गाणं आणि तो सीन हुबेहूब स्टेशन चौकातील भव्य अशा व्यासपीठावर साकारण्यात आला होता. या संपूर्ण टीम मध्ये शोले मधील गब्बर अंग्रेज के जमाने का जेलर आणि बसंती यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शोले 47 वर्षानंतर पुन्हा एकदा सांगलीकराना जसाच्या तसा पाहायला मिळाला. त्यामुळे सांगलीकरांनी दीपक चव्हाण आणि सर्वच आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
शोले महोत्सवामुळे मात्र सांगलीच्या ऐतिहासिक स्टेशन चौकाने पुन्हा एकदा गर्दीचा महापूर अनुभवला. यावेळी गब्बरच्या आणि अन्य कलाकारांच्या आवाजात महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता संदेश देण्यात आले. या कार्यक्रमास सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक धनेश काका शेटे , प्रसिद्ध हळद व्यापारी मनोहर सारडा , नगरसेवक लक्ष्मण नवलाई , माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेविका अनारकली कुरणे , कलाकार संघटनेचे सर्जेराव गायकवाड , माजी नगरसेवक शेखर माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कला रसिकांनी सहकुटुंब सहभाग घेतला होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.