प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये एमएचटी सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम आणि पीसीबी) २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रीया मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ पासुन सुरुवात झाली असून ही प्रक्रिया शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४ पर्यंत चालणार आहे. या संदर्भात अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम आणि पीसीबी) २०२४ च्या परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
बारावी सायन्स नंतर पदवी अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम आणि पीसीबी) २०२४ हि परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण असुन सदर परीक्षा शासनाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे.
सदर परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ पासुन सुरू होणार असुन या संदर्भात विद्यार्थ्यांना काही अधिक माहिती हवी असल्यास विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर तसेच काही अडचण निर्माण झाल्यास प्रा. अनिल निकम ९४२३७४११५०, प्रा. उमेश घोलप- ८०५५१०३७१५, प्रा. विनोद मोरे- ९९७५४६३७४६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.