प्रतिष्ठा न्यूज

स्वावलंबनातून शिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी केली ग्रीटिंग भेटकार्ड

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथील परशुराम विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वावलंबनातून शिक्षण उपक्रम अंतर्गत विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या भेटकार्डांची विक्री जिल्हा परिषद कोल्हापूर येथील कार्यालयात करण्यात आली. सुमारे महिनाभर चाललेल्या या ग्रीटिंग कार्ड च्या निर्मितीत विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पनेतून सुंदर व विविध प्रकारच्या ग्रीटिंग्स तयार केल्या व त्या पर्यावरण पूरक होत्या. ग्रीटिंग्सची विक्री जिल्हा परिषद कार्यालयातच करण्यात आली व प्रतिसाद ही मिळाला.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, इतर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थिनींच्या या कलेचे कौतुक केले. या ग्रीटिंगची खरेदी केली. त्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळाले. या विक्रीतून जी रक्कम प्राप्त झाली त्या रकमेतून विद्यार्थिनींसाठी बुद्धिबळाचे पट खरेदी केले जाणार आहेत. त्यामुळे स्वकमाई चांगली स्मरणात राहील.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुद्धा विद्यार्थिनींच्या या कलेचे कौतुक केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुस्ताक वडगावे व इतर सदस्य उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक आर.एम. गोसावी कस्तुरबा बालिका वस्तीगृहाच्या समन्वयिका श्रीमती देवेकर
प्रोत्सानाखाली शिक्षक दिगंबर गिरीबुवा, सुनीता सुतार, जनार्दन देशमुख यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. शाळेतील इतर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे त्यासाठी सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.