प्रतिष्ठा न्यूज

मारतळा येथे 8 मार्च जागतिक महिला दिनी कष्टकरी महिलांचा सत्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील मारतळा येथे आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औदित्य साधून येथील कष्टकरी महिलांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील सूर्यवंशी व पत्रकार गणेशराव पाटील ढेपे यांनी परिस्थिती बदल न रडत बसता मिळेल ते काम करून संसाराचा गाडा चालवत असलेल्या महिलांचा शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
मारतळा हे नांदेड हैदराबाद महामार्ग रोडवरील बाजारपेठेचे गाव असून 25 ते 30 गावांचा संपर्क असलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे सतत वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर भाजीपाला, फळे, फुले, हार विकून व शेतातील कामे करणाऱ्या शेतमजूर तसेच हॉटेलमध्ये साफसफाई भांडी धुणे आदी कामे करून आपल्या हातावर पोट असलेल्या व संसाराचा गाडा चालवत असलेल्या कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात शेतकरी महिला लक्ष्मीबाई कोंडीबा डोंगरे, ललिता अशोक सूर्यवंशी, अंजना नरेश फुलारी, कचराबाई पवार या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप सूर्यवंशी, पत्रकार गणेशराव पाटील ढेपे, माजी सरपंच माधवराव ढेपे, डॉ.स्वामी, उद्धव ढेपे, तुकाराम पांडुर्णे, शंकर डोंगरे, राजू हातणे, गजभारे आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.