प्रतिष्ठा न्यूज

उदयसिंग उर्फ बाळ पाटील यांचा मरणोत्तर समाजभूषण पुरस्काराने सन्मान

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्याचे भाग्यविधाते, कै.उदयसिंह उर्फ बाळ पाटील यांनी तालुक्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय हिंदू महासभा, अखिल भारतीय भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी संघटना, सोशल मीडिया कोल्हापूर यांचे वतीने महामंडलेश्वर स्वामी आनंद काडसिद्धेश्वर महाराज यांचे हस्ते आदर्श समाजभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे पुत्र व डॉ.डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी स्वीकारला. काल शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.