प्रतिष्ठा न्यूज

सुट्टीत मामाकडे आलेल्या भाच्याचा नदीत बुडून मृत्यू

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : सुट्टी निमित्त ‘ मामाच्या गावाला’ आला आणि भाच्याचा मृत्यू झाला. ही घटना वेतवडे तालुका पन्हाळा येथे घडली. खेरिवडे तालुका गगनबावडा या गावचा आदित्य शिवाजी पाटील ( वय १३) असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून मामांचे गावी आला होता. शुक्रवारी रोजी दुपारी चार च्या दरम्यान तो वेतवडे येथील धामणी नदीत अंघोळीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. रात्री साडेसात वाजता त्याचा मृतदेह सापडला. कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात शवाविच्छेदन करून मृतदेह कुटुंब यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.शनिवारी पहाटे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.