प्रतिष्ठा न्यूज

मांजर्डे येथे ११ लाख ३७ हजार रूपयांचा सशंयित केमिकलचा साठा हस्तगत : स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, सांगली व तासगांव पोलीसांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मांजर्डे (ता. तासगाव) येथे ११,३७, ३७०/- रूपयांचा सशंयित केमिकलचा साठा हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, सांगली व तासगांव पोलीस ठाणे यांनी ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी, दिनांक २३/०३/२०२४ रोजी इरळी ता. कवठेमहंकाळ येथील शेतात असलेल्या शेड मध्ये मुंबई पोलीसांनी छापा टाकून एम डी ड्रग्ज व एम डी ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त करून प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे रा. बलगवडे ता. तासगांव जि. सांगली, प्रसाद मोहिते रा. माजर्डे ता. तासगांव जि. सांगली इतर ४ इसमाना ताब्यात घेतले होते.

दि. ३१.०३.२०२४ रोजी माजर्डे गांवी दत्तनगर ते वायफळे जाणारे रोडजवळ बाळासो मोहिते यांचे घरालगत असले पत्र्याचे शेड मध्ये संशयीत द्रव पदार्थाचा साठा करुन ठेवला आहे अशी गोपनिय बातमीदार मार्फत बातमी प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे मा. संदीप घुगे, पोलीस अधिक्षक, सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव श्री. सचिन थोरबोले यांनी कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडील सपोनि / पंकज पवार व स्टाफ यांना आदेश देवून मिळाले बातमीची खात्री करून कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे सपोनि पंकज पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगांव विभाग, तासगांव यांचे अधिकार पत्र प्राप्त करून दोन पंच, धनश्री स्वामी, निवासी नायब तहसिदार तासगांव, राहुल सुरेश कारंडे, निरीक्षक अन्न औषध प्रशासन सांगली, अनिल आनंदराव पोवार, सहयोगी प्राध्यापक, रसायन शास्त्र विभाग वॉलचंद कॉलेज सांगली, महेश अरुण सुर्यवंशी, फोटोग्राफर, रॉयल फोटो स्टुडिओ मांजर्डे असे मांजर्डे दत्तनगर ते वायफळे जाणारे रोडजवळ असले पत्र्याचे शेड येथे जावून बाळासो रंगंराव मोहिते व.व. ४७ धंदा शेती रा. गट नं. ३५६ ब, मांजर्डे, ता. तासगांव जि. सांगली यांचे पत्र्याचे शेडवर छापा टाकला असता संशयीत द्रव पदार्थ क्लोरोफॉर्मने भरलेले एकूण २८० कि. ग्रॅम वजनाचे एकूण १५ बॅरेल व संशयीत द्रव पदार्थ असलेले ४० लिटर क्षमतेचे एकूण १२ कॅन असा एकुण ११,३६,३७०/- रू चा संशयीत द्रव पदार्थ मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंबई क्राईम ब्राचने इरळी कवठेमहकांळ येथे कारवाई करून अटक केलेला आरोपी नामे प्रसाद मोहिते याचे घराशेजारील पत्र्याचे शेड मधून सदरचा संशयीत मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा मुद्देमाल हा इरळी येथील मुख्य आरोपी प्रविण उर्फे नागेश शिंदे व प्रसाद मोहिते यांनी काही दिवसादिवसापुर्वी सदरचा संशयीत मुद्देमाल वरील

ठिकाणी आणून लपवून ठेवला असलेबाबत माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सदरचा मुद्देमाल हा पुढील कारवाई करणेकामी तासगांव पोलीस ठाणे याचे ताब्यात देण्यात आला आहे.

या कारवाईत मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोखर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव श्री. सचिन थोरबोले पोनि सतीश शिंदे स्था.गु.अ शाखा, सांगली पोनि सोमनाथ वाघ, तासगाव पोलीस ठाणे सपोनि पंकज पवार स्था.गु.अ.शाखा सांगली, पोफौ कुमार पाटील स्था.गु.अ शाखा सांगली. पोना/सागर टिंगरे, विटा पोलीस ठाणे, सपोफौ / मुलाणी, पोहेकॉ / बिरोबा नरळे, अमोल पैदाळे, दरीबा बंडगर, संदिप गुरव, इम्रान मुल्ला, अमर नरळे, सागर लवटे, प्रदीप खाडे पोना / संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, उदय माळी पोकॉ/गणेश शिंदे स्था.गु.अ.शाखा, सांगली पोफौ / अविनाश घोरपडे, बाबासाहेब बदने पोहेकॉ/अभिजीत गायकवाड, सचिन जौंजाळ, अरुण पाटील, शिवाजी मडले, पोकों/ निलेश ढोले, सुरज जगदाळे, प्रदीप पाटील सर्व तासगांव पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.