प्रतिष्ठा न्यूज

घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी जेरबंद – २,५०,००० चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी जितेंद्र ऊर्फ जित्या दगडू काळे, वय ५० वर्षे, रा. पारधी वस्ती, करगणी ता. आटपाडी जि. सांगली याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून २,५०,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २७/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, एक इसम घर फोडी चोरी करून मिळालेले सोन्याचे दागिने विक्रीकरीता मिरज ते अंकली जाणारे रोडवरील मंगल काळे यांचे घराचे जवळ आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज ते अंकली जाणारे रोडवरील नवीन पुलाचे जवळील मंगल काळे यांचे घराचे परीसरात निगराणी करीत असताना, एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव जितेंद्र ऊर्फ जित्या दगडू काळे, वय- ५० वर्षे, रा. पारधी वस्ती, करगणी ता. आटपाडी जि. सांगली असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, वरील वर्णनाचे दागिने मिळून आले. त्यास सदर सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागिंतले की, तो व त्याचा साथीदार महेश माचीस पवार रा. करगणी याचेसोबत दिघंची मधील घनचक्र मळा येथे काही दिवसापुर्वी घर फोडी चोरी केली होती, सदरचे दागिने हे त्या चोरीतील असल्याची कबूली दिली.

सदर बाबत आटपाडी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचे दागिने पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले. जितेंद्र ऊर्फ जित्या दगडू काळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर आटपाडी व तासगाव पोलीस ठाणेस घरफोडी चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी आटपाडी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत.
या कारवाईत मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, आटपाडी पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शा, सहा. पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, आटपाडी पोलीस ठाणे, पोहेकों/ आमसिध्द खोत, हणमंत लोहार, राजु शिरोळकर, संकेत मगदुम, अमोल ऐदाळे, बाबासाहेब माने, पोना / सोमनाथ गुंडे, पोशि / सुनिल जाधव, सोमनाथ पंतगे, रोहन घस्ते, स्था. गु. अ. शा, पोहेकॉ / दादासो ठोबरे, पोना / अर्जुन बोडके, पोशि / अमोल पाटील आटपाडी पोलीस ठाणे. पोशि / कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.