प्रतिष्ठा न्यूज

इस्लामपूर येथे सोना फौंडेशनच्या वतीने महिला सन्मान फौंडेशनच्या सदस्यांना व्यवसाय मार्गदर्शन

प्रतिष्ठा न्यूज
वाळवा प्रतिनिधी : इस्लामपूर येथे सोना फौंडेशन (महाराष्ट्र राज्य)च्या वतीने खास महिला सन्मान फौंउंडेशन इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील महिला सदस्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त जेष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते सत्यवान मंडलिक यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोना फौंउंडेशनचे अध्यक्ष श्री अविनाश गायकवाड (माहिती अधिकार) वाळवा तालुका यांनी भूषविले तर सामाजिक कार्यकर्ते विक्रम धुमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. महिला सन्मान फौंउंडेशन इस्लामपूरच्या अध्यक्षा आसमा तांबोळी व मार्गदर्शक समीर तांबोळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
सन १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ते एक देश म्हणून पण जेव्हा या देशातील प्रत्येक व्यक्ती विशेषतः महिला स्वयंपूर्ण होईल आणि प्रत्येकाच्या मनात समानतेची भावना निर्माण होईल तेव्हा ते खरे देशाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल असे प्रतिपादन करताना जेष्ठ साहित्यिक/व्याख्याते सत्यवान मांडलीक त्यांनी महिलांना उद्योग व्यवसायातून सक्षम होऊन आपल्या कुटुंबाला आधार देतानाच समाजापुढे आदर्श होऊन समाजाची सेवा करुन देशाचे नेतृत्व करावं असं आवाहन केलं. स्त्रियांनी स्वतःला कमजोर न समजता स्वतःचे कुटुंब, चारित्र्य सांभाळून समाजहित उराशी बाळगून देशाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असा उपदेशाचा कानमंत्र दिला. नेतृत्व करण्यासाठी महिलांनी कमीत कमी भांडवलातून का असेना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करून किंवा समूहाने एक संघ होऊन बहुपर्यायी व्यवसायाच्या निवडी करून योग्य वेळ, चिकाटी, आत्मविश्वास, संयमी वृत्ती,मधूर वाणी असे गुण अंगी जोपासून स्वतःस स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. गृह उद्योगांपासून ते इंडस्ट्रीपर्यंत आता महिलांनी स्वयंस्पूर्तीने आघाडी घेतल्याशिवाय नेतृत्वाला बळकटी येत नाही. अगोदर महिलांनी स्वतः स्वयंपूर्ण होऊन मग देशाचा विकास करण्यासाठी सिध्द झालं पाहिजे असे प्रतिपादन केले. महिला ही कुटुंबाची जसा हळवा आधार आहे तशी देशाची ही भवितव्य आहे अशी खात्री देऊन श्री सत्यवान मंडलिक यांनी महिलांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री अविनाश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शक यांची ओळख करून देतानाच साहित्याची ओळख, यशस्वी समाजकार्य व उद्योग व्यवसायातील त्यांचे योग्य व मोलाचे मार्गदर्शन आपणास कसे उपयोगी पडणारे आहे त्याबद्दल श्री सत्यवान मंडलिक यांची तसेच इतर मान्यवरांची ओळख करून दिली. सामाजिक कार्यकर्ते समीर तांबोळी यांनी महिलांनी एकत्र येऊन स्वयंपूर्ण होऊन बनण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने शिबिराचे आयोजन करण्याचा हेतू स्पष्ट करून सांगितला. महिला सन्मान फौंउंडेशनच्या अध्यक्षा सौ आसमा तांबोळी यांनी प्रास्ताविक केले तर सर्व मान्यवरांनी मिळून श्री सत्यवान मंडलिक यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. महिला सन्मान फौंउंडेशनच्या सदस्या मेहेज बिन मोमीन, जाहिदा तांबोळी, आसमा शेख तसेच नूतन खोत यांनी शेवटच्या प्रश्नोत्तराच्या चर्चा सत्रात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी सोना फौंउंडेशनच्या संचालिका नूतन खोत यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून या मार्गदर्शनातून नक्कीच बोध घेण्याचे आश्वासन दिले व सर्वांचे मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.