प्रतिष्ठा न्यूज

रौप्यपदक विजेता संकेत सरगरचे पृथ्वीराज चव्हाण यांचेकडून कौतुक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि. 3 : राष्ट्रकुल स्पर्ध्येमध्ये 55 किला वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये रोप्यपदक मिळविणा-या संकेत महादेव सरगर याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कौतुक केले. संकेत आणि काजल सरगर या भावंडांना खुप मोठे भवितव्य आहे असे ते म्हणाले, श्री. चव्हाण यांनी आज संकेत सरगरच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे उपस्थित होते. दोन राष्टीय खेळाडूनां जन्म देणा-या महादेव व राजश्री सरगर यांचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी कोच मयुर सिंहासने, वडील महादेव सरगर, आई राजश्री सरगर, बहीन काजल सरगर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक संतोष पाटील, मदिना बारूदवाले, इलाही बारुदवाले, अल्ताफ पेंढारी, संजय कांबळे, सनी धोतरे, रवी खराडे, आशिष चौधरी, प्रताप चव्हाण, मौला वंटमुरे, जैद मगदुम, धनंजय खांडेकर, शहाजी सरगर, दत्ता ठोंबरे, महावीर पाटील, जमील मुल्ला, घाडगे, संजय संकपाळ, इरफान मुल्ला, महमद शेख, राजेंद्र कांबळे, राजू कलाल, पिंटू जमादार, तुकाराम टेंगले, नाना दुधभविकर, मुन्नाभाई मुल्ला, आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.