प्रतिष्ठा न्यूज

सार्वजनिक शिक्षण व्यवस्था वाचविण्याची गरज : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण; तिसरी विभागीय शिक्षण बचाव परिषद उत्साहात

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शिक्षणाच्या खासगीकरणामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे. शिक्षकांसह सर्व समाजघटकांनी पुढाकार घेऊन ही व्यवस्था वाचवावी लागेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
नांदेड येथे दि. 28 जानेवारी रोजी शुभारंभ मंगल कार्यालयात तिसरी विभागीय शिक्षण बचाव परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उ‌द्घाटन करताना चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष- सूर्यकांत विश्वासराव हे होते.तर प्रमुख उपस्थितीत शिक्षण बचाव समितीचे राज्य समन्वयक रमेश बिजेकर, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, एकनाथ दादा पवार, मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम हे होते. पुढे बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, मानवाच्या विकासात शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असताना सरकार त्यापासून पळ काढत असल्याने शिक्षण बचाव परिषद आयोजित करावी लागत आहे.
फुले शाहू आंबेडकरां मुळे सर्वसामान्याला शिक्षण मिळाले, परंतु शिक्षणाचे खासगीकरण करून सरकार सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे बंद करीत आहे. त्यामुळे शिक्षण बचाव चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप द्यावे लागेल, असे मत शिक्षण रमेश बिजेकर यांनी केले. सूर्यकांत विश्वासराव यांनी अध्यक्षीय सम रोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटराव चिलवरवार यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.आनंद कर्णे यांनी केले. परिषदेस डॉ.मारुती तेगमपुरे, डॉ.बालाजी कोम्पलवार, उपप्राचार्य नाना शिंदे, संजय सिप्परकर, प्राचार्य सूर्यकांत जोगदंड, व्यंकटराव चिलवरवार, आनंद मोरे, डॉ.डी.एन.मोरे, डी.बी.नाईक, आर.पी. वाघमारे, तानाजी पवार, विठ्ठल चव्हाण, प्रा.परशुराम येसलवाड, राजेश पवार, वसंत सिरसाट, जी.पी. कौशल्य, ई.डी.पाटोदेकर, विजयालक्ष्मी स्वामी, मन्मथ मठपती, डी.जी.तांदळे, अशोक मस्कले, राम यडते, वसंत माने, मोहन पिनाटे, राजेश जाधव, विनोद भुताळे, बालाजी टिमकीकर, काशिनाथ इसादकर यासह अनेकांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.