प्रतिष्ठा न्यूज

युवा नेते रोहित दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासगावात पार पडल्या भव्य आर.आर.मॅरेथॉन स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : युवानेते रोहीत आर आर पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त युवक राष्ट्रवादीचें उपाध्यक्ष युवानेते अक्षय धाबुगडे यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तासगाव आणि आर आर पाटील स्पोर्ट्स क्लब तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने R R मॅरेथाॅन स्पर्धा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडल्या.सिध्देश्वर चौक येथून स्पर्धेस प्रारंभ झाला.तीन वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या.विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.स्पर्धेच्या ठिकाणी फटाक्यांच्या,हलगी व तुतारी वादकांच्या जल्लोषात रोहित दादा पाटील यांचं आगमन झालं.यावेळी स्पर्धकांनी,आयोजकांनी त्यांच जल्लोषात स्वागत केलं.मान्यवर उपस्थितांच्या सोबत विधानभवनच चित्र असलेला *दमदार आमदार* लिहलेला केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या स्पर्धेत सुमारे 1000 स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धे साठी सर्वांना प्रवेश मोफत होता तसेच सर्वांना मोफत टी शर्ट देण्यात आले.या आर.आर.मॅरेथॉन 2024 स्पर्धेसाठी कोल्हापूर ,सांगली,सातारा,सोलापूर जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.विजेता स्पर्धकांना जवळपास 1,00,000 लाखांची बक्षिसे देण्यात आली.यावेळी संपूर्ण तासगाव शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचे अक्षय भैय्या चव्हाण-धाबुगडे व सहकाऱ्यांनी शिस्तबध्द नीटनेटके आयोजन केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.