प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडच्या अजिंक्य कोळवले यांची ५ कंपनीत निवड

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले अजिंक्य कोळवले” यांची ५ कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात तसेच प्लेसमेंट मध्ये दमदार वाटचाल करून सोलापुर जिल्ह्यात नंबर १ स्थान पटकाविले असल्यामुळे पालक वर्गातून पंढरपुर सिंहगडचे कौतुक होत आहे.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेले कोळे (ता.पंढरपूर) येथील कुमार अजिंक्य सुरेश कोळवले या विद्यार्थ्यांने ५ आय. टी. कंपनीत कॅम्पस मुलाखती दिली होत्या. यामधुन अजिंक्य कोळवले यांची एँक्सचेर, चेग इंडिया, विप्रो, एलेशन आणि इन्फोसिस आदी ५ आय. टी. कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. निवड झालेल्या एँक्सचेर कंपनीत ६.५० लाख वार्षिक पॅकेज, चेग इंडिया कंपनीत ३ लाख वार्षिक पॅकेज, विप्रो कंपनीत ३.५० लाख वार्षिक पॅकेज आणि इन्फोसिस कंपनीत ३.६० लाख वार्षिक पॅकेज मिळणार असुन यापैकी अजिंक्य कोळवले हे एँक्सचेर कंपनीत नोकरी करणार असल्याचे यादरम्यान त्यांनी सांगितले आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अजिंक्य कोळवले यांची ५ आय. टी. कंपनीत निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.