प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात फुड फेस्टिव्हल उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.३० : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे पद्मश्री डॉ ग गो जाधव महाविद्यालयात फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी तसेच गगनबावडा परिसरातील महिला बचत गट यांनी विविध पदार्थ बनवून ते प्रदर्शन व विक्री करता ठेवले होते. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. फूड फेस्टिवलचे उद्घाटन गगनबावड्याच्या सरपंच मानसी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस उपसरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल व्ही एस पाटील, प्रा. डी के पाटील, प्रा.एच एस फरास, प्रा. एस एस घाटगे, प्रा.आर आर सरनोबत यांनी केले. यावेळी प्रा. डॉ.एस एस पानारी, प्रा. ए एस कांबळे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संस्था अध्यक्ष प्रा. सतीश देसाई सचिव व प्र.प्राचार्य डॉ. विद्या देसाई मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.