प्रतिष्ठा न्यूज

श्री समर्थ रामदास स्वामी ट्रस्ट सज्जनगड यांच्याकडून वाचन चळवळ ग्रंथालयास पुस्तके भेट

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : वाचन चळवळ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेले अनेक वर्षे सामाजिक कार्य करत आहे. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून बालरत्न मासिक संचलित वाचन चळवळ महाराष्ट्र राज्य ही संस्था काम करत आहे.प्राथमिक शाळेमध्ये वाचन चळवळीचे ग्रंथालय सुरु करुन प्राथमिक दशेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व मुलांनी वाचनाकडे वळावे यासाठी वाचन चळवळीच्या माध्यमातून ठिकठिकाणी कार्यक्रम केले जातात. वाचन चळवळ दिनदर्शिका(२०२३) प्रकाशन समर्थ ट्रस्टचे अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.या दिनदर्शिकेमध्ये सामाजिक लेखाचे प्रामुख्याने दर्शन घडते.वाचन चळवळीसाठी कार्यरत लेखकांनी सदरचे लेख लिहले आहेत.या दिनदर्शिकीचे प्रकाशन सज्जनगड येथे पार पडले यावेळी समर्थ ट्रस्टकडून वाचन चळवळ ग्रंथालयास समर्थ लिखित पुस्तके भेट देण्यात आली.वाचन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राहुल वेदपाठक यांनी पुस्तकांचा स्वीकार करत समर्थ ट्रस्टचे आभार मानले.यावेळी वाचन चळवळीचे उपाध्यक्ष एम.आर.पाटील,आर.बी.पाटील,जयदीप तोडकर,कुमार निवळे,दिगंबर गुरव,आपासो मुळीक,दीपक पाटील इ.उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.